Mon. Dec 6th, 2021

सचिनचा मुलगा अर्जून कुबडया लावून जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

सचिनचा मुलगा अर्जुनने कुबड्या लावून जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला पोहचला. तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जस्टिन बिबरची म्युझिक कॉन्सर्ट बुधवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होता. जस्टीनच्या या कॉन्सर्टला सिनेमा आणि क्रिकेट जगतातील बडी मंडळी उपस्थित होती.

 

या कॉन्सर्टला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन देखील जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला उपस्थित होता. अर्जुनच्या पायाला दुखापत झाली आहे, दुखापतीचं कारण माहित नाही, पण अर्जुन कुबड्या लावून जस्टीन बिबरच्या कार्यक्रमाला उपस्थित होता, यावरून जस्टीन बिबरने क्रेझ कळते. मात्र, अर्जुनच्या पायाला दुखापत झाली हे ऐकून सचिन तेंडुलकरचे फॅन्सही निश्चितच हळहळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *