Tue. Oct 20th, 2020

हिमालयात हिममानव! भारतीय लष्कराला आढळले ठसे

अनेकदा हिममानवासारखं पात्र आपण सिनेमांमध्ये बघतो. अनेक कथांमध्येही हिममानवाविषयी ऐकत असतो. पण खराखुरा हिममानव दिसला म्हटल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळल्याचे ट्विट भारतीय सैन्याने केले आहे. यामुळे हिममानवाच्या किस्से पुन्हा समोर येत आहे. हिममानवाच्या पावलांच्या ठस्यांचे फोटो देखील ट्विट केले आहेत.

हिमालयात हिममानव!

नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये  हिममानव फिरत असल्याचा दावा नेहमीचं लोक करत असतात.

केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारखा दिसणारा हिंस्त्र मानव असं या हिममानवाचं वर्णन केलं जात.

भारतीय सैन्याला  सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ एका हिममानवाच्या पावलाचे ठसे सापडले आहेत.

नेपाळ- चीन सीमेजवळच्या  परिसरात हिममानवाचे ठसे  दिसले आहेत.

 

हे ठसे मानवी पावलासारखे दिसत अअसून त्याचा आकार 32 X 15 इंच इतका होता.

या हिममानवाला हिमपर्वतरांगांमधील स्थानिक लोक यती असं म्हणतात.

या परिसरात गिर्यारोहण करणाऱ्या अनेक गिर्यारोहकांनीही यतीला पाहिल्याची सांगीतलं जात आहे.

तर स्थानिक लोक या हिममानवापासून नेहमी सावधचं असतात.

भारतीय सैन्याने अशा हिममानवाच्या पावलाचे ठसे सापडल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

हिममानवाच्या पावलांच्या ठस्यांचे फोटो देखील ट्विट केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *