सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर भर थंडीत फूटपाथवर झोपण्याची वेळ

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर भर थंडीत फूटपाथवर झोपण्याची वेळ
सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.
सध्या राज्यात ९ जिल्ह्यांसाठी परभणीत सैन्य भरतीला सुरुवात झाली आहे. ४ ते १४ जानेवारी या कालावधीत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
या भरतीसाठी एकूण ६५ हजार तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी रात्री १२ पासून सैन्यभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
या परीक्षेला मोठ्या प्रमाणावर तरुण उमेदवार आलेत. मात्र आलेल्या तरुणांच्या तुलनेत व्यवस्था नसल्याने तरुणांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला.
त्यामुळे भरतीच्या पहिल्याच दिवशी अनेक तरुणांमध्ये निराशा पाहायला मिळाली.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे.
ही प्रक्रिया एकूण 10 दिवस चालणार आहे. या भरतीसाठी दररोज ३ जिल्ह्याच्या ५-६ हजार उमेदवारांना इथं बोलावलं जात आहे.
सैन्य भरतीच्या पहिल्या दिवशी नंदुरबार, बुलडाणा आणि परभणीतील तरुणांना परीक्षेसाठी बोलावण्यात आले.
अनेकवेळा परीक्षार्थी परजिल्ह्यातून येतात. त्या
मुळे परीक्षेच्या १ दिवसाआधीच परीक्षेच्या ठिकाणी दाखल होतात. यानुसार हे तरुण रात्री ९ वाजत दाखल झाले होते.
मात्र या परीक्षेला भररात्री म्हणजेच १२ वाजता सुरुवात झाली. त्यामुळे विविध जिल्ह्यातून भरतीसाठी आलेल्या तरुणांची सरकारच्या वतीने कोणतीही सोय करण्यात आली नाही.
परिणामी या तरुणांवर भर कडाक्याच्या थंडीत झोपावे लागले.
देशसेवेसाठी अनेक तरुण सैन्यात भरती होण्याची इच्छा असते. परजिल्ह्यातून हे तरुण परीक्षेच्या आधी परीक्षेच्या ठिकाणी दाखल होतात.
परंतु झोपण्याची सोय नसल्याने या तरुणां फुटपाथवर झोपण्याची वेळ येते. हे असे चित्र पोलीस भरतीच्या वेळेही पाहायला मिळते.