Mon. Apr 19th, 2021

करोनाविरुद्ध लष्कराचं ‘ऑपरेशन नमस्ते’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि सर्वत्र ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीत भारतीय लष्करी अधिकारी आणि सैनिकांच्या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी ‘ऑपरेशन नमस्ते’ सुरू करण्यात येत आहे. भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.२००१ मध्येदेखील ऑपरेशन पराक्रमदरम्यान ८ ते १० महिन्यांत कुणालाही सुट्टी दिली गेली नव्हती, अशीही माहिती नरवणे यांनी दिली.  ऑपरेशन नमस्ते लष्कर यशस्वी करून दाखवेल, असा विश्वासही नरवणे यांनी व्यक्त केला आहे.

सरकार आणि प्रशासन कोरोनाविरोधात लढत असताना सामान्य जनतेच्या मदतीसाठी आता लष्करदेखील सिद्ध झालं आहे. कोव्हिड १९ चा धोका असताना लष्कर फिट असणं गरजें आहे. यासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये १ आठवड्यात २ ते ३ Advisories जारी केली जात असल्याची माहिती नरवणे यांनी दिली.  

अशा प्रकारच्या सर्व अभियानांत आत्तापर्यंत लष्कराला यश मिळालं आहे. ऑपरेशन नमस्तेलाही यश मिळेल, असा विश्वास मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे. आर्मीतर्फे देशभरात 8 क्वारंटाईन केंद्र उभी केली आहेत. लष्करातर्फे हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे. सेंट्रल कंमांड, नॉर्दन कमांड, सदर्न कमांड,  साऊथ वेस्टर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, आणि दिल्ली मुख्यालयात लष्करातर्फे Corona Helpline Centers उभारण्यात आली आहेत. लष्कराने कोरोनाग्रस्तांच्या मदतीची तयारी सुरू केली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *