डॉ. तेलतुंबडे यांची अटक अवैध, कोर्टाचा निर्वाळा!

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संश्यावरून डॉ. तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र पुणे सत्र न्यायलयाने तेलतुंबडे यांच्यावरील अटकेची कारवाई बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे.
काय घडलं तेलतुंबडेंसोबत?
डॉ. तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावरून अटक केलं.
दुपारी तेलतुंबडे यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी तेलतुंबडे यांचा वकील रोहन नहार यांनी 11 फेब्रुवारीपर्यंत अटके पासून संरक्षण मिळत असून सुद्धा त्यांची अटक केल्याचा आरोप लावला.
तसंच विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनीही अटक अवैध असल्याचं सांगितलं
त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे शुक्रवारी तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज याच न्यायालयाने फेटाळला होता.
संबंधित बातमी- नक्षली संबंधांसदर्भात पोलिसांचा गौप्यस्फोट