Thu. Apr 22nd, 2021

‘आता न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करू शकता ‘ भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

‘देशातील मुस्लिमांनी खुश व्हायला हवे. ते आता न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करू शकतात.तसेच भाजपचे अविवाहित नेतेही आता काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात आणि लग्न करू शकतात.’ असे विधान त्यांनी केले आहे. यावर सर्व स्तरातून टीका होत आहेत.

मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर त्यावरती अनेक प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. हे कलम हटवल्यानंतर आता काश्मीरी मुलीसोबत लग्न करता येणार आहे. यावरती सोशल मिडीयावरही अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत. तर भाजप आमदार विक्रम सैनी यांची यावरती बोलताना पुन्हा जीभ घसरली आहे. ‘देशातील मुस्लिमांनी खुश व्हायला हवे. ते आता न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करू शकतात.तसेच भाजपचे अविवाहित नेतेही आता काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात आणि लग्न करू शकतात.’ असे विधान त्यांनी केले आहे. यावर सर्व स्तरातून टीका होत आहेत.

विक्रम सैनींची जीभ घसरली?

कलम 370 मुळे काश्मीरी मुलीशी लग्न करण्यास निर्बंध येत होते. परंतु आता ते हटवल्यानंतर हे निर्बंध निघाले आहेत. यावर सोशल मिडीयासह सर्वत्र चर्चा होत आहे. यातचं भाजप आमदार विक्रम सैनी यांनी यावर बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे पुन्हा ते चर्चेत आले आहेत.

काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करताना सैनी यांनी वादग्रस्त विधान केले. ‘देशातील मुस्लिमांनी खुश व्हायला हवे. ते आता न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करू शकतात. इतकंच नाही तर भाजपचे अविवाहित नेतेही आता काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात आणि लग्न करू शकतात.’ असं विधान त्यांनी केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे त्यांचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे. काश्मीरी महिलांवर असे वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे. 370 रद्द केल्याच्या निर्णयाच्या स्वागतासाठी कठौली येथे शेकडो भाजप कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्याठिकाणी ते बोलत होते.

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला आहे. यावेळी लोकसभेतही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. परंतु अमिक शहांनी गोंधळातही हा प्रस्ताव मांडला. सोमवारी तितक्याच गोंधळात हा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर सर्वत्र यावरती प्रतिक्रीया नोंदवण्यात येत आहेत.

भाजप आमदार विक्रम सैनी हे अशा वादग्रस्त विधान करत असतात. पण काश्मीरचा विषय हा अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांच्या विधानाचा निषेध होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *