#Article370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमधील जनतेचं भविष्य सुरक्षित- पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर देशाला संबोधित केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी,स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह करोडो देशभक्तांचं स्वप्न पूर्ण झाल्य़ाची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले पंतप्रधान?
कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेचं नुकसान झालं. या कलमामुळे काश्मीरी जनतेला काहीच फायदा झाला नाही.
कलम 370 चा पाकिस्तानने शस्त्रासारखा वापर केला
या कलमाच्या आधारे काश्मीरी तरुणांची भडकवलं जात होतं.
42000 लोकांना प्राण गमावावे लागले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीर, लडाखचा विकास होणार आहे. त्यांचा वर्तमान सुधारणार आहे आणि त्यांचं भविष्यही सुरक्षित राहणार आहे.
जनतेच्या हितासाठी संसद कायदे तयार करते. मात्र संसदेचे कायदे जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नव्हते
अनेक महत्वाच्या कायद्यांपासून जम्मू-काश्मीरची जनता वंचित होती. महिलांना संपत्तीचा अधिकार नव्हता. काश्मीरच्या लोकांचा हक्क हिरावून घेतला गेला होता. अट्रोसिटी कायदाही काश्मीर खोऱ्यात लागू नव्हता.
इतर केंद्रशासित प्रदेशासारखी सुविधा जम्मू-काश्मीरच्या कर्मचारी, पोलिसांना मिळेल. जम्मू-काश्मीरच्या सर्व कर्मचाऱ्यांना या सुविधा लागू होणार
‘नोकऱ्या मिळणार’
काश्मीर आणि लडाखमध्ये सर्व रिक्त पदे भरणार. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल
लष्कर आणि निमलष्करी दलात स्थानिक युवकांना प्राधान्य देणार
पंतप्रधान स्कॉलरशीप योजना लागू करणार
काश्मीरच्या जास्तीत जास्त युवकांना याचा लाभ मिळणार
ज्या योजना केवळ कागदावरच राहायच्या त्या प्रत्यक्षात उतरवणार
काश्मीरच्या प्रशासनात पादर्शकता आणणार
सर्व उच्च शिक्षणाच्या संस्था जम्मू-काश्मीरात आणणार
दळवळण योजना, विमानतळाचं आधुनिकीकरण करणार
‘तुमचा प्रतिनिधी तुम्हीच निवडणार’
काश्मीरमध्ये असंख्य लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता
विधानसभा, पंचायत निवडणुकांसाठी उभं राहता येत नव्हतं
आता तुमचे जनप्रतिनिधी तुम्हीच निवडून देणार
जम्मू-काश्मीरला मंत्रीपरिषद, मुख्यमंत्री, विधानसभा राहणार आहे
जम्मू काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग आहे
नागरिकांचं जीवनमान सुधारणार
नागरिकांना हक्काचं मिळणार
लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार
नवे तरुण आमदार होणार
या निवडणुका पंचायतीसारख्याच पारदर्शक होणार आहे, याचं मी आश्वासन देतो.
‘प्रगतीचे मार्ग खुले होतील’
लडाख केंद्रशासित राज्य राहणार
काश्मीरी जनता फुटीरतावादी शक्तींचा नायनाट करेल
जनतेला पारदर्शकता आणि योग्य प्रशासनामुळे काश्मीरमध्ये प्रगतीचा मार्ग खुले होतील.
काही घराण्यामुळे इतरांना संधी मिळत नव्हती, मात्र आता ती संधी सर्वांना उपलब्ध होणार आहे.
‘पुन्हा सिनेमांचं काश्मीरमध्ये शुटिंग करावं’
सर्वांनी आपल्या मतदासंघाचं नेतृत्व करावं, विकासाची धुरा हाती घ्यावी.
काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी, सिनेमांचं शूटींग करावं असं आवाहन मोदींनी बॉलिवूड आणि तामिळ, तेलुगू सिनेसृष्टीला केलं.
काश्मीरमध्ये तंत्रज्ञानाचा पाया मजबूत व्हावा, टेक्नालॉजीचा विकास झाल्यास संवाद वाढणार. युवकांची प्रगती होणार, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
लडाखमधून आता राष्ट्राला युवा खेळाडू मिळणार.
लडाखच्या हर्बल औषधीचा, सेंद्रीय अन्नधान्याचा देशात विस्तार होणार.
‘लडाखच्या विकासाची जबाबदारी केंद्राची’
केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे लडाखच्या विकासाची जबाबदारी आता केंद्राची आहे. केंद्राच्या योजनांचे सर्व लाभ लडाखच्या जनतेला मिळणार आहे. लडाख पर्यटन, धार्मिक पर्यटनाचं मोठं केंद्र होईल.
देशाच्या भावनांचा आदर करावा. संसदेत पाठींबा देणाऱ्या आणि विरोधाच्या पुढे जाऊन सर्वांनी मिळून काश्मिरी जनतेच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करुयात.
आम्हाला जम्मू-काश्मीर, लडाखच्या लोकांची चिंता आहे.
‘ईद साजरी होताना कोणताही त्रास होणार नाही’
दहशतवाद, फुटीरतावादाला पाकिस्तानाचा पाठींबा आहे. मात्र काश्मीर जनता पाकिस्तानविरोधात उभी ठाकलीये.
परिस्थिती सामान्य झाल्यावर सर्व सुरळीत होईल. काश्मीरमध्ये ईद साजरी करण्याला कुठलाच त्रास होणार नाही.
‘नव्या जम्मू- काश्मीर, लडाखचं निर्माण करू’
जम्मू काश्मीरच्या सर्व सुरक्षा दल, प्रशासनाचा,पोलिसांचा आभारी आहे. तुमच्या परिश्रमामुळे काश्मीरची परिस्थिती बदलेल असा आत्मविश्वास आहे.
दहशतवादाविरुध्द लढतांना अनेक काश्मीरी जनतेनं बलिदान दिलंय. सर्व जण मिळून नव्या जम्मू काश्मीर, लडाखच निर्माण करु.