मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प; श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता पण सर्वसामान्यांना काय मिळणार?
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणारायत. अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. आतापर्यंत कृषी आणि महिलांविषयक योजनांवर केंद्रीय अर्थसंकल्पात भर दिला जात होता.
यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकरामध्ये आणखी सवलत मिळेल, अशी नोकरदारांना आशा आहे. तर, वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार याबाबतीतही काही तरतूद केली जाईल, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना वाटते