Thu. Jul 16th, 2020

काय आहे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’?

‘रमा माधव’ (Rama Madhav), ‘विहीर’, ‘कासव’, ‘राजवाडे अँड सन्स’ यांसारख्य़ा सिनेमांमधून आपली ओळख निर्माण करणारा मराठी अभिनेता आलोक राजवाडे (Alok Rajwade) याने दिग्दर्शित केलेला ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या आलोकने या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. (Marathi Cinema)

काय आहे हा सिनेमा?

अश्लील उद्योग मित्र मंडळ या सिनेमात वयात येणाऱ्या मुलाची कथा आहे.

टीनएजर (Teenager) मुलाच्या सेक्शुअल फॅण्टसी (Sexual Fantasy) आणि त्याचा खरं प्रेम शोधण्याचा प्रवास असा बोल्ड विषय या सिनेमात आहे. (Bold Indian Films)

या सिनेमाची मांडणी वेगळ्या शैलीची असल्याचं आलोकचं म्हणणं आहे. तसंच सिनेमाची भाषा ही तरुणाईची भाषा आहे, असंही आलोकचं म्हणणं आहे.

पर्ण पेठे (Parn Pethe) आणि अभय महाजन (Abhay Mahajan Pitcher) या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसंच अमेय वाघ (Ameya Wagh), अक्षय टाकसाळे (Akshay Tanksale), ऋतूराज शिंदे (Ruturaj Shinde) हेदेखील या सिनेमात आहेत. या सिनेमाने 2018 साली MAMI चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *