आसामी महिलांनी राज ठाकरेंना राखी बांधली अन्…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजप सत्तेत आल्यापासून प्रादेशिक भाषेवर अन्याय होत असल्याचा आरोप आसामच्या भुमिपुत्रांनी केला.
आज आसामच्या ‘स्वाधीन नारी शक्ती’ संघटनेच्या महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत भेट घेऊन आसाम अस्मितेविषयीच्या आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी आसामी महिलांनी राज ठाकरेंना राखी बांधून आसामला भेट देण्याची विनंती केली. तसेच राज ठाकरेंनी आसामच्या भूमिपुत्रांना आपल्या विचारांचे मार्गदर्शन करावे
अशी मागणीही यावेळी करण्यात आली.