Sat. Jun 6th, 2020

विधानसभा निवडणूक: राज्यात ‘या’ बंडखोरांची माघार

आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या बंडोबाचा थंडोबा करण्याचा प्रयत्न  केला जात आहे. काही बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेना – भाजपामध्ये झालेली युती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी यामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला. याचा परिणाम म्हणजे राज्यात बंडखोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र होते. या बंडखोरांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.  आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या बंडोबाचा थंडोबा करण्याचा प्रयत्न  केला जात आहे. काही बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

राज्यातील ‘या’ बंडखोर उमेदवारांनी घेतली माघार

भाजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी बंडखोरी करत भोर वेल्हा मुळाशी या मतदारसंघात अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार रवींद्र भेगडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.  भाजप-शिवसेनेचे उमेदवार महादेव जानकर यांनी माघार घेतली असून भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उमेदवार संतोष गांगण यांनी अर्ज मागे घेतला आहे तर काँग्रेस उमेदवार विनय पाटील यांनीही माघार घेतली आहे.  करमाळा विधानसभा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेत संजय शिंदे यांना पाठींबा दिला आहे.

भाजप बंडखोर डॉ. माधुरी बोरसे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी समजूत घातल्यानंतर डॉ बोरसे यांनी माघार घेतली आहे. मनसेचे उमेदवार आणि माझी महापौर अशोक मुर्तडक यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेवून भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसच मध्ये दाखल झालेले बाळासाहेब सानप यांना पाठिंबा देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

शिवसेना उमेदवार बळीराम ठाकरे या  शिवसेना नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांची निवडणुकीतून माघार घेतली.परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे यांनी कोथरूडमधून माघार  घेत चंद्रकांतदादा पाटील यांना पाठींबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *