Tue. Jul 7th, 2020

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु दादा जे.पी.वासवानी यांच निधन…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे 

साधु वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे.पी.वासवानी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. दादांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गुरू दादा जे.पी.वासवानी यांनी कायम शाकाहार आणि प्राणी हक्कांना प्रोत्साहन दिले. धर्मनिरपेक्ष आध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी साधु वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला.

त्यांचे पुर्ण नाव जनश पहलराज वासवानी होते वासवानी हे पेशाने हैद्राबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. पुण्यात त्यांच्या साधू वासवानी मिशनचे मुख्यालय असून जगभर त्यांचे आध्यात्मिक केंद्रदेखील आहे.

दादा वासवानी 2 ऑगस्ट रोजी आपल्या वयाची शंभरी पूर्ण करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाल्याने मिशन आणि त्यांच्या जगभरातील अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *