Jaimaharashtra news

आता ATM सेंटर बंद होणार ?

आपल्या सोयीसाठी उपलब्ध असणारे ATMची संख्या कमी होत असून बरेच बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बॅंकेत न जाता आणि त्वरीत पैसे उपलब्ध करणारे ATM बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. ATMची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे लोकांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरबीआयच्या नवीन नियमावलीमुळे देशातील निम्मे ATM बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

RBI ने नियमावलीत बदल केले असून यामध्ये ATM मशीनबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहे.

नवीन नियम आणि बदल केल्यामुळे बॅंकेला आर्थिक भुर्दंडाला समोरे जावे लागणार आहे.

तसेच काही बॅंकांनी ATM मशीनच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे अनेक ठिकाणी बॅंकांचे ATM बंद असल्याचे दिसून येत आहे.

सध्या डिजिटल युगात ATM मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

त्यामुळे ATM मशीन बंद झाल्यावर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

RBIची नवीन नियमावली काय ?

ATM मध्ये नेहमी 100 करोडपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध असणे गरजेचं.

सीसीटीव्ही, वायरलेस कम्युनिकेशन, हुटर्स आणि जीपीएस असणे गरजेचं.

त्याचबरोबर सुरक्षारक्षक असणे गरजेचं असेल.

तसेच पैशांची ने आण करणाऱ्या व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक असणेही गरजेचं.

 

 

 

 

Exit mobile version