Thu. Nov 26th, 2020

एटीएमला आग लागल्याने मशीन जळून खाक

परभणी : येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमला रात्री आग लागली. आग लागल्याने एटीएम मशीन जळून खाक झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

शहरातील नवीन जिल्हा परिषद इमारतीसमोर भारतीय स्टेट बँक आहे. हे या बँकेच्या बाजूलाच एटीएम आणि सिडीयम मशिन आहेत. या एटीएम सेंटरवर दिवसभर नागरिकांची वर्दळ असते.

मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास या एटीएममध्ये आग लागल्याचे परिसरातील लोकांच्या लक्षात आले. आगीचे लोट एटीएम सेंटरच्या बाहेर पडत होते.

आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत एटीएम सेंटरमधील दोन सिडीयम मशिन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. परिसरातील लोकांनी तातडीने अग्निशमन दलास माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अर्धा ते एक तास ही आग विझविण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळास एसबीआयचे अधिकारी नानलपेठ आणि नवा मोंढा पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदत केली.

या मशीन मध्ये किती रक्कम होती तसेच त्या रकमेला हानी पोहोचली का, याची माहिती एसबीआयचे अधिकारी घेत आहेत. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज बँकेच्यावतीने वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *