भाजप नगरसेवक कमलाकर कोपलेंवर हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीडमधील अंबाजोगाई येथे किरकोळ कारणावरून भाजप नगरसेवक कमलाकर कोपले यांच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याचा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात नगरसेवक कोपले गंभीर जखमी झाले तर नगरसेविकेचे पती दिलीप काळे यांनाही मार लागलाय.
दोन गाड्यांतून हल्लेखोर आले आणि लाकडी दंडुकांचा वापर करून कोपले यांना मारहाण केलीय.