Mon. Jan 17th, 2022

अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. केजरीवाल यांच्या डोळ्यात तिखट घालण्याचा प्रयत्न केला गेला. हा हल्ला करणारा मुख्यमंत्र्यांच्या नावाने कुठलंसं पत्र देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आला होता, अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.

लाल मिरचीचं तिखट डोळ्यात घालून त्या इसमाने केजरीवाल यांना धक्काबुक्की केल्याचं समोर आले. या हल्ल्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांना फारशी दुखापत झालेली नसली, तरी डोळ्यात तिखट घालतावेळी त्यांचा चष्मा खाली पडला.

अनिल शर्मा असं हल्लेखारचं नाव असल्याचं समजले आहे. मुख्यमंत्र्याना देण्यास आलेले पत्र स्वीकारण्यात न आल्याने त्याने रागाच्याभरात थेट केजरीवाल यांच्यावर लाल मिरचीचं तिखट उधळून धक्काबुक्की केली. त्याने ती मिरची पूड पान मसाल्याच्या पाकिटातून लपवून आणली होती. जसे केजरीवाल तिसऱ्या मजल्यावरच्या आपल्या कार्यालयातून बाहेर पडले तसेच शर्माने खिशात लपवलेली मिरची पूड त्यांच्या चेहऱ्यावर फेकली.

सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार लक्षात घेऊन शर्माला तातडीनं अडवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *