Wed. May 18th, 2022

भाईंदरमध्ये महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

भाईंदरमध्ये महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये महिला डॉक्टर गायत्री जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

भाईंदर पश्चिम येथे अमृतवाणी रस्त्यावर नारयणा शाळेजवळ डॉ. गायत्री जयस्वाल यांचा दवाखाना आहे. सकाळच्या सुमारास काही अनोळखी इसमांनी या दवाखान्यात प्रवेश केला आणि महिला डॉ. गायत्री जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी महिला डॉक्टरचे दागदागिने, मोबाईल, पैसे घेऊन पसार झाला. भाईंदर  पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी उपस्थित झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडले?

डॉक्टर जयस्वाल आपल्या दवाखान्यात बसल्या होता. त्यावेळी एक इसम मास्क घालून दवाखान्यात आला. त्याचवेळी एक दाम्पत्य उपचारासाठी दवाखान्यात आले तेव्हा मास्क घातलेली व्यक्ती दवाखान्याबाहेर गेली. आणि ते दाम्पत्य दवाखान्यातून निघून गेल्यावर पुन्हा मास्क घेतलेला व्यक्ती दवाखान्यात आला. आरोपीने रक्तदाब तपासायच्या यंत्राने महिला डॉक्टर गायत्री जयस्वाल यांच्या डोक्यावर अनेकवेळा हल्ला केल्या. या हल्ल्यामध्ये डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला ३५ ते ४० टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.