Sun. Feb 28th, 2021

घाटकोपरमध्ये भाजपाचे उमेदवार पराग शहांच्या गाडीची तोडफोड

घाटकोपरमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पराग शहांच्या गाडीसमोर ठिय्या करत शहांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपाने 7 उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये घाटकोपरमध्ये पराग शहा यांच्या नाव जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाने प्रकाश मेहता यांना डावलून पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे घाटकोपरमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पराग शहांच्या गाडीसमोर ठिय्या करत शहांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

घाटकोपरमध्ये तणाव

प्रकाश मेहता हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांना डावलून पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. त्यांच्याऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पराग शहा यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड केली.

‘प्रकाश मेहता, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पराग शहा यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली आहे.प्रकाश मेहता आणि किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थीती आटोक्यात आली.

‘ही आपली संस्कृती नाही. पक्षाचा आदेश आपण पाळला पाहिजे’, अशी भुमिका प्रकाश मेहता यांनी घेतली आहे. घाटकोपरमध्ये पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *