1073 जिल्ह्यात 20 कोटीमध्ये होणार 25 रेतीघाटांचा लिलाव
यवतमाळ जिल्ह्यातील 25 रेतीघाटांची लिलाव…

यवतमाळ, दि. 9. 12. 2020 : जिल्ह्यात 21 या वर्षाकरीता यवतमाळ जिल्ह्यातील 25 रेती वाळूघाटांच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरण (एसईआयएए) समितीने ऑनलाईन बैठकीत सहमती दर्शविलेली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील 25 रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पर्यावरण विभागांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षेतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीच्यावतीने 25 रेतीघाटांचा लिलाव ई – निविदा, ई –लिलाव पध्दतीने करण्यात येईल. उक्त 25 रेतीघाटांमध्ये 126686 ब्रास परिमाण असून 20.47 कोटी रुपये अपसेट प्राईस निश्चित करण्यात आलेली आहे. सदर 25 रेतीघाटांमध्ये जिल्ह्यातील यवतमाळ येथील 1, बाभुळगाव 3, आर्णी 4, राळेगाव 2, कळंब 1, घाटंजी 3, झरी जामणी 2, वणी 2, मारेगाव 2, उमरखेड 3 आणि महागाव तालुक्यातील 2 रेतीघाटांचा समावेश आहे.