Sun. Jul 5th, 2020

औरंगाबादच्या काँग्रेसचे आमदारानं एकाच वेळी केले 555 मुलींचे कन्यादान

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त तब्बल 555 मुलींचे कन्यादान केले. त्यांनी सामूहिक विवाह सोहळा भरवला आणिएक दोन नव्हे, तर तब्बल 555 जोडप्यांच्या लग्नाच्या साथीनं या आमदारांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पाडला. मुलगी आणि जावयानेही अगदी आनंदाने अब्दुल सत्तार यांचा प्रस्ताव मान्य करीत सामूहिक लग्नात आपला विवाह केला. सत्तार यांनी या आधी सुध्दा आपल्या मुलाचा विवाह याच पद्धतीनं लावला होता. अशी लग्नं लावल्यानं एक वेगळं समाधान मिळत असल्याची भावना आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठवाड्यात सामूहिक विवाह हे नक्कीचं कौतुकास्पद आहे. यातून अनेक निराधारांना मोठा आधार मिळालाय. त्यात राजकारणी कुटुंबंही याच पद्धतीनं लग्न करायला लागले, तर निश्चितच एक चांगला संदेश समाजामध्ये दिला जातो. शिवाय लग्नात लाखो-कोट्यवधींची उधळण करणाऱ्यांना थोडासा विचार करायलाही भाग पाडतो. विशेष म्हणजे बडेजावपणात चढाओढ करणाऱ्या राजकीय नेत्यांना यातून मोठी चपराक बसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *