Thu. Jul 16th, 2020

औरंगाबाद: कचऱ्याची जाळपोळ सुरुच

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याची जाळपोळ करण्याचे प्रताप अजूनही थांबलेले नाहीत. सेंट्रल बसस्टँड परिसरात 25 टक्के कचरा पेटवून देण्यात आल्याने परिसरात धुराचे वातावरण पसरले होते. शहरातील कचराकोंडी फोडण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या वाटा दोन महिन्यानंतरही उमगलेल्या नाहीत.

या कचऱ्याला आग लावण्यात आल्याने परिसरातील बस स्टँड, मिल कॉर्नर आणि समर्थनगरचा भाग धुरात बुडाला होता. आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *