Wed. Dec 11th, 2019

एमआयटी कॉलेजच्या पर्यवेक्षक,प्राचार्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील एमआयटी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पर्यवेक्षक आणि प्राचार्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी शहरातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी केलीय. जोपर्यंत गुन्हा मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत शहरातील कोणत्याच महाविद्यालयात परीक्षा घेणार नाहीत असा पवित्रा शहरातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकांनी घेतलाय. आज पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांना शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी निवेदन दिले.

तीन दिवसांपूर्वी सचिन वाघ याला कॉपी करताना पकडल्यानंतर त्यांनी बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *