Jaimaharashtra news

…अशी झाली कर्णपुरा देवीची घटस्थापना

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

गुरुवारी नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील नऊ दिवस प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण असणार आहे.

 

राज्यात सर्वत्र देवीची घटस्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादच्या कर्णपुरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे देवीची घटस्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे कर्णपुरा देवीला महास्नान घालण्यात आले. सूर्यास्थापूर्वी महाआरती करुन याठिकाणी घटस्थापना पार पडली.

 

औरंगाबादचं आराध्यदैवत असलेल्या कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून रांगेत उभे असतात. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात मराठवाड्यातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. तसेच, याठिकाणी यात्राही भरते.

 

नवरात्रीच्या काळात भाविकांची संख्या लाखांवर असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

Exit mobile version