Jaimaharashtra news

खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून कोरोनाचे नियम धाब्यावर

औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील यांनी शासनाच्या कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत औरंगाबादमध्ये दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी एका रिसॉर्टमध्ये जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जलील यांच्यावर चक्क नोटांची उधळण करण्यात आली.

औरंगाबादमधील खुलताबाद परिसरात कव्वालीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर लोकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण केली.

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एकाही व्यक्तीने यावेळी मास्क घातला नव्हता. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती.

Exit mobile version