Mon. May 17th, 2021

ऑस्ट्रेलियाकडून भारतीय प्रवासी विमानांवर बंदी

भारतात कोरोनाचा कहर सुरूच आहे. भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ऑस्ट्रेलियाने कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. या आधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत.

सध्या भारतात आयपीएल सुरू असून ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि काही नागरिक देखील भारतात दाखल आहेत. या निर्णयामुळे ते देखील भारतात अडकून राहणार असल्यामुळे त्यांना आता १५ तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियाला परत जाता येणार नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.

‘१५ मे पर्यंत विमानांवर असलेली ही बंदी कायम राहणार आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे’, असं स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलं आहे. याआधी थायलंड, नेदरलँड, इराण, कॅनडा, युएई, हाँगकॉंग या देशांनीदेखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *