Thu. Dec 3rd, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजबद्दल पॉंटिगची भविष्यवाणी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारपासून वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. एकूण ३ वनडे मॅचची ही सीरिज असणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीमचं नेतृत्व एरॉन फिंच करणार आहे.

या सीरिजबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटीगने भविष्यवाणी केली आहे.

टीम इंडिया मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज असेल. परंतु ऑस्ट्रेलिया ही वनडे सीरिज २-१ च्या फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी पॉंटिंगने केली आहे.

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडवर मालिका विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विश्वास दुणावला असेल.

ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी टीम इंडियाचा २-३ च्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.

रिकी पॉंटिगने ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत बोलताना अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

टीम इंडिया विरुद्धची मालिका कोणती टीम जिंकणार ? याबद्दल पॉंटिगला चाहत्याने अंदाज वर्तवण्यास सांगितला होता.

काय म्हणाला पॉंटिंग ?

‘ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप आणि टेस्ट सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीममध्ये आत्मविश्वास आहे. पण टीम इंडियादेखील मागील पराभवाचा वचप्यासाठी सज्ज असेल.

ऑस्ट्रेलिया ही सीरिज २-१ ने जिंकणार’, अशी भविष्यवाणी पॉंटिंगने केली.

‘मला वाटतं की तो मीडल ऑर्डरमध्ये टीमसाठी चांगली कामगिरी करेल.

तो स्पिनविरोधात चांगला खेळतो. तो चांगला फिल्डर आहे, एकूणच तो चांगला खेळाडू आहे. अशी प्रतिक्रिया पॉंटिगने मार्नस लाबुशेन बद्दल दिली.

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे.

त्यामुळे मार्नस लाबुशेनला मंगळवारच्या पहिल्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते.

मार्नस लाबुशेनने २०१८ मध्ये पाकिस्तान विरोधात टेस्ट डेब्यु केलं. यानंतर त्याने ५ टेस्टमध्ये त्याने ८९६ धावा कुटल्या होत्या.

मार्च २०१९ मध्ये भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ वनडे मॅचची सीरिज खेळण्यात आली होती.

यामध्ये पहिल्या २ मॅच टीम इंडियाने जिंकल्या होत्या.

यानंतरच्या ३ मॅच ऑस्ट्रेलियाने सलग जिंकत मालिका देखील जिंकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *