सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवानांचा मृत्यू

सियाचिनजगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा हिमस्खलनाचे संकट कोसळले. या दुर्घटनेत बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण सियाचिन भागात आज सकाळी लष्कराचं गस्तीपथक गस्तीवर होते. या दरम्यान ही दुर्घटना घडली.
दरम्यान अशीच घटना 8 नोव्हेंबरला घडली होती. सियाचीन ग्लेशिअर येथ गस्ती पथक हिमस्खलनात अडकले होते. यात 4 जवान शहीद झाले होते.