Wed. Feb 26th, 2020

Video : ‘बागी 3’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ (Baaghi 3) सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. ‘बागी’ आणि ‘बागी 2’ या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं होतं. त्यामुळे बागी 3 बद्दल टायगरच्या (Tiger Shroff) चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात बागी नंतर पुन्हा श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) टायगरसोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सिनेमात रितेश विक्रमच्या आणि टायगर टोनीच्या भूमिकेत आहेत. दोघांच्या वडिलांची भूमिका अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) करत असून या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ हे खरेखुरे पिता-पुत्र सिनेमात बापलेकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘बागी 3’ मध्ये विक्रमचं अबू जलाल नामक खलनायक अपहरण करतो. तेव्हा सिरीयामध्ये कार्यरत असणारा टोनी सर्व सीमा पार करत आपल्या भावाला परत आणण्यासाठी लढाई सुरू करतो, अशी या सिनेमाची कथा आहे.

‘बागी’ सिनेमात टायगरसोबत श्रद्धा कपूर होती. ‘बागी 2’ मध्ये टायगर श्रॉफसोबत दिशा पटाणी (Disha Patani) होती. तिसऱ्या भागात पुन्हा टायगरची जोडी श्रद्धा कपूरसोबत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *