Sun. Jan 16th, 2022

मराठमोळ्या भाषेत ‘बाहुबली’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

‘बाहुबली’ या बॉलीवूड चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. आता बॉलीवूडमधील बाहुबली चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्या प्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने बाहुबलीचा खास मराठमोळा साज आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.

मराठमोळा बाणा जपत डोळे दिपवून टाकणाऱ्या ‘बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न प्रत्येकाला घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठी बाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल ठरणार आहे. मराठी भाषेत सादर होणाऱ्या बाहुबली चित्रपटाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कडे असणार आहे तर डॉ. अमोल कोल्हे, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे हे कलाकारसुद्धा या मराठीत डब होणाऱ्या बाहुबली चित्रटाशी संबंधित आहेत. येत्या दिवाळीमध्ये मराठमोळा बाहुबली प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मराठी डबिंग चित्रपटाचे लेखन स्नेहल तरडे यांनी केले आहे. तर संकेत धोतकरने चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभांळली आहे. बाहुबली पात्रासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाज दिला आहे. तर देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज देण्यात येणार आहे. चित्रपटाचे गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आणि कौशल इनामदार यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. संगतीकार आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात प्रेक्षकांना गाणी ऐकण्यात मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *