‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद पुन्हा चर्चेत
कांता प्रसाद यांनी सुरु केले नवे रेस्टॉरंट

कोरोनाच्या संकटात दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’चे मालक ८० वर्षीय कांता प्रसाद चर्चेत आले होते. सुरुवातीला ढाब्याचा धंदा डबघाईला आलेले बाबा फूड ब्लॉगर गौरव वासनच्या मदतीने सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर गौरव आणि त्यांच्यात वादामुळे देखील ते व्हायरल झाले होते.
दरम्यान आता कांता प्रसाद यांनी मालवीय नगरमध्येच नवे रेस्टॉरंट सुरू केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या नव्या रेस्टॉरंटचे नाव ‘बाबा का ढाबा’ असेच ठेवले असून याठिकाणी भारतीय आणि चायनीझ दिशेस दिल्या जाणार आहेत. दरम्यान यावेळी कांताप्रसाद यांनी समस्त जनतेचे आणि त्यांना मदत केलेल्यांचे आवर्जून आभार मानले