Fri. Sep 25th, 2020

बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ संघटनेचे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेनं पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर ताबा आंदोलन केलं. या आंदोलनात शेतकऱ्याच्या उसाचे थकीत FRP रक्कम त्वरित देण्यात यावी अशा मागणी केली. या मागण्यावर दोन ते तीन दिवसात योग्य तो तोडगा काढला जाईल अस आश्वासन आयुक्तांनी दिलय.

नेमकं काय प्रकरण आहे ?

प्रहार शेतकरी संघटनेनं आज पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर ताबा आंदोलन केलं.

या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकऱ्याचे उसाचे थकीत FRP रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली.

हे आंदोलन 1500 कोटी थकीत FRP त्वरित देण्यासंदर्भात केले होते.

या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल इमारतीमध्ये घुसून घोषणाबाजी केलीय.

सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये साखर सम्राट बसले आहेत.

गेल्या तीन चार महिन्यापासून शेतकऱ्यांचा फोन येत आहेत.

कारखानदार दोन्ही पार्टीत आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही आहे.

शेतकऱ्यांचे व्याजासहित पैसे देण्यात यावे ते नाही झालं तर कारखानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.

सहकारमंत्र्याच्याच कारखान्याचे पैसे बाकी आहेत.त्यामुळे आता कारवाई नाही केली तर आम्ही जाणार नाही अशी भूमिका प्रहार नेत्यांनी घेतलीय.

या मागण्यासाठी साखर आयुक्त सोबत बैठक झाली असून पुढील दोन ते तीन दिवसात यावर योग्य तोडगा काढला जाईल अस आश्वासन आयुक्तांनी दिल आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *