Wed. Mar 3rd, 2021

“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”- बच्चू कडू

Maharashtra minister Bacchu Kadu threatens Danve over claims on farmers’ protest

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: देशात कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. “सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात” असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.


दरम्यान, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली. “गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असंही कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *