Wed. Sep 23rd, 2020

बच्चू कडू यांचा अधिकाऱ्यांना दम

“माझ्या अंतर्गत येणाऱ्या खात्याची कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर त्या अधिकाऱ्याची नोकरी थांबली” अशा खड्या शब्दात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे.

आज साताऱ्यातील जिल्हापरिषदेच्या सभागृहात जिल्हयातील महिला व बालविकास, जलसंपदा, शालेय शिक्षण विभागाची एकत्र बैठक घेतली. या बैठकीत सामान्य लोकांच्या आणि प्रलंबित कामांच्या तक्रारीवर माहिती घेऊन ज्या विभागातील फाईल्स प्रलंबित आहेत. यावर माहिती घेऊन संबधित विभागातील अधिकाऱ्याने या फाइलच्या प्रवासाची संपूर्ण माहिती पुढील महिन्यात सादर करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

या पुढील काळात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचं त्यांनी बैठकीत सांगितले आहे.

एका महिन्यात किती तक्रारी आल्या त्या तक्रारीचा प्रवास कसा झाला फाईल किती वेळ थांबवली गेली यांचा सगळा गोषवारा तपासला जाईल. याच्यात जर कोण अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर मी कारवाई करणार, असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.

लोकांच्या त्रासामुळे मी मंत्री झालो आहे. मला सध्या महाराष्ट्रात कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडवणारा कोणी तयार झाला नाही.
माझ्यावर कुणी दबाव आणेल आणि मी त्याचं ऐकेन असं होणार नाही.
एक वेळ माझ मंत्री पद जाईल पन लोकांना न्याय देण्यासाठी कोण अडवत असेल तर मी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *