Fri. Apr 23rd, 2021

परदेशवारीसाठी ‘Bajaj Allianz’च्या ब्रांच मॅनेजरकडून शेतकऱ्यांची फसवणूक!

महाराष्ट्र ग्रामीण बँकेबरोबर Bajaj Allianz कंपनीने करार केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा काढण्याचा सपाटाच बँकेच्या वतीने सुरू करण्यात आला. बँकेच्या व्यवस्थापकाने 3 लाखाचा विमा दिला तर त्याला परदेशवारी कंपनीतर्फे मिळणार होतं. या परदेशवारीच्या अमिषाने त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बोगस सह्या करून विमा काढले. Bajaj Allianz कंपनीच्याच कर्मचाऱ्याने एका व्हिडिओद्वारे Social Media वर हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकाराने लातुरात खळबळ उडाली आहे.

 कंपनीचा करार –

बजाज अलियांझ कंपनीच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत करार करण्यात आला होता.

बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने तीन लाखाचा विमा मिळवून दिल्यास त्याला परदेशवारीची संधी होती.

त्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून विमा उतरवण्यात आले.

कर्ज काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचे जबरदस्तीने विमा काढण्यात आले असे व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्याने नमूद केले आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यात या व्हिडीओमुळे धुमाकूळ घातला आहे.

Bajaj Allianz चे ब्रांच मॅनेजर विनय जाजू यांचे वक्तव्य –

या संदर्भात  बजाज अलियांझचे ब्रांच मॅनेजर विनय जाजू यांनी आपल्याला बोलण्याचे अधिकार नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले. पुण्याच्या मेन ब्रांचमध्ये विचारा असे उत्तर देऊन  जाजू यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयात ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरु केले. या व्हिडिओ चा खुलासा करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *