Sat. Mar 6th, 2021

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, ‘या’ नेत्याची मागणी

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. प्रवीण तोगडिया हे नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावलेली. बाळासाहेंबाच्या अथक प्रयत्नांमुळे राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेसाठी परवानगी मिळायला सोपं झालं, असंही तोगडिया म्हणाले.

राम मंदिराच्या आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना सरकारने भारतरत्न द्यावा, असंही ते म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणि महंत अवैधनाथ, महंत रामचंद्र परमहंस आणि विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांनाही भारतरत्न देण्याची मागणी तोगडिया यांनी केली आहे.        

प्रविण तोगडिया यांनी २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्येही त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठीच्या समर्पणाचा उल्लेख केला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यावेळेस भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *