Wed. Jan 19th, 2022

बॅंक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून 25 लाख घेऊन पसार

सांगलीतील सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून 25 लाखाची रोकड चार चोरट्यानी लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तासगाव येथे दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

सांगलीतील तासगाव येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून 25 लाखाची रोकड चार चोरट्यानी लुटल्याचे समजते आहे.

ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी तासगाव शाखेतून 25 लाखांची रोकड घेतली.

ही रक्कम तासगाव शाखेतून विसापूर शाखेकडे घेऊन जात होते.

ही रोकड दुचाकीवरून बॅगमध्ये घेऊन जाताना चोरट्यानी दुचाकीवरून पाठलाग केला.

चोरट्यानी पाठलाग करत तासगाव-विसापूर फाट्याजवळ बॅंक कर्मचाऱ्यांना रोखले.

चोरट्यानी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण करत त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली.

यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळी गावाच्या दिशेने पसार झाले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *