बँका सुरूच राहणार

कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनीदेखील जनता कर्फ्यूची घोषणा दिली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासगी कंपन्या, दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. ३१ मार्चपर्यंत मुंबई आणि पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी महानगरांमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या ही परिस्थितीत बँका मात्र सुरू राहणार आहेत.
RBI ने जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व बँका तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संचलित वित्तिय संस्था यांना वगळण्यात आलं आहे. राज्य शासनाने याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
RBI नियंत्रित स्वतंत्ररीत्या कार्य करणाऱ्या संस्था, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, प्रायमरी डीलर्स, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या वित्तीय संस्था यांना खासगी आस्थापना बंदीमध्ये सहभागी नसतील. या संस्थांचं काम इतर दिवसांप्रमाणेच सुरू राहील, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.