बारामतीत राजगड किल्याची हुबेहूब प्रतिकृती
किल्ला तयार करणे ही दिवाळीच्या अनेक परंपरांपैकी एक परंपरा आहे

किल्ला तयार करणे ही दिवाळीच्या अनेक परंपरांपैकी एक परंपरा आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडीत वैष्णवबळी आणि प्रतीक बळी या भावंडांनी राजगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारलीय.
पंधरा दिवसाच्या अथक प्रयत्नातून हा किल्ला साकारलाय. या किल्ल्याच्या माध्यमातून त्यांनी राजगड किल्याचा इतिहास उभा केला आहे. तसेच लोकांना घरबसल्या राजगड किल्ला पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या किल्ल्याचं आणि बळी भावंडांचं सर्वत्र कौतुक होतं आहे.