बार्सिलोना इसिसच्या दहशतवाद्यांचा हल्ला, 13 जणांचा मृत्यू, 100हून जखमी
वृत्तसंस्था, बार्सिलोना
स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनानं अनेकांना चिरडल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला. यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक लोक जखमी झाले.
वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्पेन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.