Wed. Aug 10th, 2022

उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून पुण्यात मनसे- भाजपमध्ये जुंपली!

लोकसभा निवडणुका संपताच पुण्यात श्रेयवादाच राजकारण सुरू झालंय. पुणे- कोंढाव्याला मार्गावरील लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल गेले अनेक दिवस कागदपत्रात अडकला होता. लष्कराच्या परवानग्या घेऊन लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल काम पूर्ण होऊन एक महिना होत आलं तरी तो सुरू नव्हता. मात्र आचारसंहिता संपताच उद्घाटन कोणी करायचं यावर राजकारण सुरू झालंय.

उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई

लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यक्रमावर बंदी असते.

मात्र आचारसंहिता संपताच कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकातील उड्डाणपूलाचं उद्घाटन कोणी करायचं यावरून स्थनिक मनसे नगरसेवक आणि भाजप आमदार यांच्यात वाद सुरू झालाय.

मात्र मनसेने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सामान्य वाहन चालकाच्या हस्ते उदघाटन करून उड्डाणपूल वाहतुकीला खुला केलाय.

यावर मनसे नगरसेवकांनी आमदरावर टीका करत ‘खर्च महापालिकेने केलाय. यात आमदारांचा काय संबध?’ असा सवाल करत उद्घाटन केलंय.

कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकात मोठी वाहतूक कोंडी होते.

यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा उड्डाणपूल सुरू झाला तर मोठी वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे.

भाजपतर्फे होणाऱ्या उद्घाटनाचं काय?

भाजपने 2 जूनला पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते उदघाटन ठेवलं.

तर उदघाटन राजकारण्याशिवाय करत मनसेने मनसे स्टाईलने आंदोलन करत सामान्य नागरिकाच्या हस्ते उड्डाणपूल उदघाटन करत नागरिकांसाठी पूल खुला केलाय.

‘भाजपने हा पूल करण्यासाठी 2009 पासून प्रयत्न केला आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. तो असा कोणीही करू शकत नाही’, असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे

2015 साली सुरू झालेला आणि 15 कोटी खर्च करून नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या पुलाचं राजकीय प्रतिष्ठेसाठी आता दोन वेळा उद्घाटन होणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.