बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारातून धोनीला डच्चू

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वार्षिक वेतन कराराची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती बीसीसीाआयने ट्विटद्वारे दिली आहे.
वार्षिक वेतन करारामध्ये टीम इंडियाच्या एकूण २७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
यामधून टीम इंडियाच्या माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला डच्चू देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक मानधन करारात धोनीचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला होता.
परंतु धोनीला यावेळेस कोणत्याही श्रेणीत स्थान न देता थेट डच्चूच देण्यात आला आहे.
बीसीसीआयने वार्षिक मानधन करारातून धोनीला वगळल्याने धोनी समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर धोनीला डच्चू दिल्याने त्याला अप्रत्ययक्ष निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.
अधिक वाचा : टीम इंडियाचे ‘हे’ खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून वार्षिक मानधन कराराची घोषणा
दरम्यान बीसीसीआयने जाहीर केलेल्या मानधन करारात खेळाडूंची एकूण ४ तुकड्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार वर्गवारी केल्या आहेत.
यामध्ये ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी मिळणार आहेत. तर ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ५, ३ आणि १ कोटी रुपये मिळणार आहेत.
बीसीसीआयच्या या वार्षिक मानधन करारात लोकेश राहुल आणि ऋद्धीमान साहाला बढती मिळाली आहे.
लोकेश राहुलला ब गटातून अ गटात तर ऋद्धीमान साहाला सी गटातून ब गटात बढती मिळाली आहे.