Sun. Oct 17th, 2021

आयपीएलचे उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येणार आहेत.

या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती.आज बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली.

बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *