बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी आनंदाची बातमी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गिरणगावातील सुमारे 95 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत. डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी इथे 207 बीडीडी चाळी आहेत.
यातील डिलाईल रोड, वरळी, नायगाव इथल्या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 22 एप्रिलला होणार आहे.
गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या अडीच वर्षांत मार्गी लावलं. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.
तर 160 चौ. फूटांच्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना 500 चौ. फूटांची सदनिका मोफत मिळणार आहे.