Thu. Nov 26th, 2020

बीडीडी चाळींचे सर्वेक्षण बुधवारपासून, मात्र हे ध्यानात ठेवा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नायगाव व ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी येत्या बुधवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी 13 जून 1996 पर्यंतच्या वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

 

सर्वेक्षणाच्या काळात घरात मूळ मालक असणे आवश्यक असल्याची अट घातली. मात्र सध्या मे महिन्याच्या सुटीच्या काळात अनेक चाळकरी गावी गेले आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

मुख्य म्हणजे सर्वेक्षणाच्या काळात घर बंद असल्यास तशी नोंद सर्वेक्षण अहवालात केली जाणार आहे. त्यामुळे या काळात घर बंद राहणार नाही याची काळजी घर मालकाने घेणे आवश्यक आहे, असेही नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *