Mon. Aug 15th, 2022

सावधान! हेल्मेट न घातल्यास आता परवाना रद्द

केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची तब्बल २६ महिन्यानंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यामुळे आता विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चालकांना पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे. राज्यसरकारने काढलेली अधिसूचना केवळ तडजोड शुल्काची आहे. तसेच हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे.

मद्याचे सेवन करून वाहन चालवणे हा गुन्हा तडजोडीमध्ये येत नाही. परिणामी याचा समावेश यात करण्यात आलेला नाही, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे. अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे ओढवतो. यामुळे या गुन्ह्यावर भर देत राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

हेल्मेट न घातल्यास आता ५०० रुपये दडांसह तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द केले जाणार आहे. तसेच विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचे लायसन्स रद्द होणार आहे. वाहन क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्याचा गुन्हा म्हणजे दादा, मामा असे वाहन क्रमांक असलेल्यांना १७७ कलम लागू केला असून याअंतर्गत रिपलेक्टर्स नसणे किंवा टेललाइट नसणे यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच या व्यतिरिक्त सर्व गुन्ह्यांसाठी पहिल्यांदा ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा १५०० रुपये अशा दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

कलम – १७९ पोलिसांचे आदेश नाकारणे 
जुना दंड – ५००, नवा दंड – ७५०

कलम – १८० अनधिकृत वाहन चालक 
जुना दंड – ५००, नवा दंड – ५०००

कलम –  १८१ विनालायसन्स 
जुना दंड – ५००, नवा दंड – ५०००

कलम –  १८२ (१) लायसन्सची मुदत संपल्यानंतरही वाहन चालवणे 
जुना दंड – ५००, नवा दंड – १०,०००

कलम – १८९ वाहनांची शर्यत लावणे 
जुना दंड – २०००, नवा दंड – ५००० ते १००००

कलम – १९० (२) विनाकारण हॉर्न वाजवणे 
जुना दंड – ५००, नवा दंड – १००० ते ५०००

कलम – १९६ विनाविमा वाहन 
जुना दंड – ३०० ते २०००, नवा दंड – २००० ते ४०००

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.