Tue. Apr 7th, 2020

पित्याकडूनच चिमुकल्याला अमानुष मारहाण; मुलाचा तोडला हात

अनेक वेळा पालकच आपल्या पोटच्या मुलांना अमानुष मारहाण करतात. अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. दरम्यान अशीच एक पालघरमधील पित्याकडून मुलाला अमानुष मारहाणीची घटना उघडकीस झाली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भिक कमी आणली म्हणून बापानेच आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. 

निर्दयी बाप संजय याने आपल्या चिमुकल्या मुलाला दिवसभरात भीक कमी गोळा केली म्हणून बेदम मारहाण करून जखमी केलं. या मारहाणीत चिमुकल्या सूर्याचा हात तुटला असून त्याच्या हातावर पालघर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पालघर मधील गांधीनगर येथे राहणारा संजय आपल्या पत्नी व मुलाला रोज भीक मागण्यासाठी पाठवत होता. मात्र परवा मुलगा सूर्याने कमी भीक जमा करून आणल्याने संजयने त्याला लाकडी दंडुकाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. 

या मारहाणीत सूर्याच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली असून त्याच्या हाताच्या हाडाचे तुकडे झाले आहेत.

शेजाऱ्यांनी धावाधाव करत मारहाण करत असलेल्या संजयला रोखले. त्यानंतर सूर्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *