Mon. Sep 21st, 2020

मराठवाड्यात आता तयार होणार बिटापासून साखर

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या पाणीटंचाईचं सर्वात मोठं कारण मानलं जातं उसाचं पीक. उसाला बाराही महिने पाणी लागतं. या पिकाला पर्याय म्हणून शुगर बीट या पिकाची निवड करण्यात आली आहे. आता शुगर बीट पासून साखर निर्माण होणार आहे

आता महाराष्ट्रामध्ये बीटापासून साखर (Sugar) तयार होणार ऐकायला नवीन वाटतंय, परंतु हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी गेल्या दोन वर्षापासूनच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देशातला पहिला शुगर बीट लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे.

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांकडे दहा दहा गुंठे जमिनीवर या बिटाची लागवड करण्यात आली.

या दहा गुंठे मध्ये सात टन इतके बीटाचे उत्पादन झाले आणि यावर्षी वीस गुंठ्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा नव्याने लागवड केली आहे.

या वर्षी जर हे उत्पादन पंधरा ते वीसच्या दरम्यान निघाले, तर हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येणार आहे आणि पुढील वर्षी या बिटाची लागवड जिल्ह्याभरात करण्यात येईल

ऊस आणि बीटाच्या उत्पादनात हा फरक-

ऊस हे जवळपास 11 ते 12 महिन्याचे पीक असते तर बीट हे फक्त पाच महिन्याचे पीक आहे

उसापासून दहा टक्के साखर निघते तर शुगरबीट पासून 13 ते 15 टक्के इतकी साखर

शेवटी उरलेल्या विटांच्या चोथा पासून गुरांना खाद्यही तयार होतं.

1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही अशाच प्रकारचा बीटा पासून साखर निर्माण करण्याचा प्रयोग केला होता. युरोपमध्ये बिटापासून साखर केली जाते. महाराष्ट्रामध्ये या बीटापासून उत्पादन घेण्यासाठी इतका थंडीचा कालावधी नसल्याने त्या वेळी हा प्रयोग फसला होता.

परंतु यावेळी बियाण्यामध्ये आवश्यक तेवढा बदल करून कशा पद्धतीने हे पीक महाराष्ट्रामध्ये ही घेता येईल आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.

गेल्या दोन वर्षापासून या शुगर बीट वर खूप काही प्रयत्न सुरू असल्यामुळे जर या वर्षी या शुगर बीटचं चांगलं उत्पादन आलं, तर पुढील वर्षी हे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणं देण्यात येईल, अशी माहिती पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर समोर आली आहे

जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये चांगला फायदा होईल आणि कारखानदारी पण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये टिकून राहील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *