Mon. Jul 13th, 2020

जळगावमध्ये अमानुष प्रकार, चिमुकल्याच्या डोळ्यात काड्या खुपसून काचेने ओरखडेही ओढले

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जळगाव

खमीजळगावच्या यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात तिसऱीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या डोळ्यात काड्या खुपसून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा प्रकार गावातल्याच काही तरुणांनी केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

शाळेच्या शौचालयाजवळ या विद्यार्थ्याला काही तरुणांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात काड्या खुपसल्या, तसेच डोळ्याजवळ काचेने ओरखडेही ओढले आहेत.

डोळ्यांच्या जखमांनी विव्हळत असलेल्या या मुलाला आधी सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं.

मात्र तिथे योग्य उपचार झाला नसल्याचा आरोप करत त्याच्या पालकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी एका तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मात्र त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं त्याला आज कोर्टात हजर करणार नसल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *