Thu. Nov 26th, 2020

BESTचं महिला प्रवाशांना ‘बेस्ट’ गिफ्ट

मुंबईत माहिला प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने महिलांसाठी स्पेशल बस सेवा सुरू करणार आहे. तीन महिन्यामध्ये तेजस्विनी बस सेवा महिलांसाठी सुरू होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात एकूण 37 तेजस्विनी मिनी बसेस दाखल होणार आहे. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महिलांसाठी स्पेशल तेजस्विनी धावणार असल्याचे समजते आहे.

प्रवासी महिलांसाठी खूशखबर –

महिला प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनाने महिलांसाठी स्पेशल बस सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केला आहे.

मंगळवारी पार पडलेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

बेस्टच्या ताफ्यात एकूण 37 तेजस्विनी मिनी बसेस दाखल होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत महिलांसाठी खास बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी नवीन बसेस खेरदी करावे लागणार असून तेजस्विनी योजनेअंतर्गत निधी वापरला जाणार आहे.

राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत 11 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

या बसची किंमत 29 लाख 50 हजार असून मिडी व डिझेलवर चालणाऱ्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *