Fri. Dec 3rd, 2021

रिमझिम पाऊस आणि गरमागरम भजी

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

मुसळधार पावसात गरमागरम भज्यांची आठवण झाली तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. कांदा, मिरची, कोथंबीर घातलेली खमंग भजी प्रत्येकालाच खावीशी वाटतात.

 

खवय्यांची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी जळगावमध्ये मराठी प्रतिष्ठानतर्फे चक्क भज्यांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी खवय्यांसाठी खास पंधरा प्रकारची खमंग आणि झणझणीत भजी उपलब्ध करून देण्यात आली.

 

तर तिथेच राज्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही या महोत्सवाला हजेरी लावली. रिमझिम पाऊस आणि बाजूला मेहरूण तलावाचा हिरवागार निसर्गरम्य परिसर असा योग जुळून आल्यानं या भजी मोहोत्सवाला जळगावकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *